शिक्षकांच्या समस्येबाबत शासन निद्रावस्थेत - सुधाकर अडबाले

एकाच शिक्षकांला चार वर्गाचा भार, शिक्षकांची पदे त्वरीत भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी

चंद्रपूर: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांची तब्बल ३१ हजार ४७२ पदे रिक्त आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकांला चार वर्गाचा भार देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने त्वरीत शिक्षक भरती घेण्याची मागणी टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून होवू लागली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कटक मंडळ, तसेच मनपा स्वयंअर्थसहायीत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळामध्ये शिक्षकांची ३१ हजार ४७२ पदे रिक्त आहेत.

Recommended read: साहित्य संमेलन आयोजनासाठी संस्थांना सात लाखाचा निधी उपलब्ध करून देणार- आ. जोरगेवार

कुठे किती शिक्षकांची पदे रिक्त ?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत एकूण २ लाख ४५ हजार ५९१ शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी २ लाख १४ हजार ११९ शिक्षकांची पदे भरण्यात आली आहे. तर, ३१ हजार ४७२ पदे अद्यापही रिक्त आहे.

जिल्हा परिषदेमधील शाळांमध्ये १९ हजार ४५२ पदे, महानगरपालिका शाळांमध्ये ११ हजार ९८ पदे, नगरपालिका शाळेत ९०१ पदे, तर छावणी शाळेत २१ पदे असे एकणू ३१ हजार ४७२ शिक्षकांची पदे रिक्त असलयाची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. ही रिक्त पदे शासकीय शिक्षकांची आहे.

Recommended read: नऊ बकऱ्या फस्त करणारा महाकाय अजगर पकडला..

याव्यतिरिक्त खाजगी संस्थेतील शिक्षकांची आकडेवारी गणली गेल्यास रिक्त पदाची संख्या ५० हजारांच्या वर जाण्याची शक्यता आहे. राज्यात पुरेसे शिक्षक नसल्यामुळे एका शिक्षकांला दोन ते तीन वर्ग एकाचवेळी सांभाळावे लागत आहे. अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्ग १ ते वर्ग ४ साठी एकच शिक्षक नेमण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे बालवयात मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे शासनाने त्वरीत लक्ष घालून रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे अशी मागणी टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून होवू लागली आहे.

शिक्षकांअभावी विद्यार्थी राहिले ताटकळत

गोंडपिपरी तालुक्यातील मोठी बेरडी येथील जिल्हा परिषदेच्या वर्ग १ ते ४ चा संपूर्ण भार एका शिक्षिकेवर होता. सदर शिक्षिका वरिष्ठांना कळवून सुट्टीवर गेल्या. मात्र, विद्यार्थ्यांना याची साधी कल्पनाही नव्हती. विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत येवून दिवसभर ताटकळत उभे होते. शिक्षण विभागाने तात्पुरता शिक्षक नेमून वेळ काढून न्यायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. या सर्व प्रकारमुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकाराचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला काहीएक साेयरसुतक नव्हते.

Recommended read: मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेशाला प्रखर विरोध

शिक्षकांच्या समस्येबाबत शासन निद्रावस्थेत – सुधाकर अडबाले

शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाव्दारे वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहे. शिक्षकांच्या समस्येबाबत शासन निद्रावस्थेत असून शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अशैक्षणिक कामे दिली जात आहे. शासनाने वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याऐवजी रिक्त पदे तात्काळ भरावे-
सुधाकर अडबाले, सरकार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ.

By Amol Ghugul

Founder IG Media Chandrapur Sub Editor - Omkar Wandhare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!