नागपूर विभागात ३५ हजार शिक्षक मतदार

नागपूर विभागात ३५ हजार शिक्षक मतदार

चंद्रपूर: १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी शिक्षक मतदार यादीमध्ये नाव असले तरी पात्र शिक्षकाने नमुना – १९ मध्ये आपले नाव नव्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.

Recommended read: गोंडपिपरीत भीषण अपघात

जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षक मतदार यादी नोंदणी संदर्भात पत्रकारांना माहिती देतांना ते बोलत होते. शिक्षक मतदार संघाकरीता विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असून सर्व जिल्हाधिकारी व सर्व उपविभागीय अधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. तसेच जिल्ह्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिष, पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी नमुना – १९ मधील अर्ज स्वीकारण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये पूर्णवेळ कार्यरत शिक्षक सदर निवडणुकीसाठी नाव नोंदविण्यास पात्र असून पार्ट टाईम शिक्षक पात्र नाही. यादीत नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय उपलब्ध नसल्याने प्रत्येक पात्र शिक्षकांना ऑफलाईन पध्दतीने नमुना –१९ मध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Recommended read: खासदार बाळू धानोरकर यांनी दाखविले पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन

नागपूर विभागात जवळपास ३५ हजार मतदार असून जिल्ह्यात ५ हजार ६३८ मतदार आहेत. शिक्षक मतदार यादी नोंदणीकरीता जिल्ह्यातील पात्र शिक्षकांनी नव्याने आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे, नायब तहसीलदार गभणे उपस्थित होते.

असा आहे मतदार यादी नोंदणी कार्यक्रम

मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (३) अन्वये जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा – दिनांक १ ऑक्टोबर २०२२,

वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी– दिनांक १५ ऑक्टोबर २०२२,

वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी– २५ ऑक्टोबर २०२२,

नमुना –१९ द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा -अंतिम दिनांक ७ नोव्हेंबर २०२२,

हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई– १९ नोव्हेंबर २०२२,

प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी २३ नोव्हेंबर २०२२,

दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी -२३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२२,

दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे -२५ डिसेंबर आणि

मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक-३० डिसेंबर २०२२ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!