CIIIT ट्रेनिंग प्रकल्प : अडीच हजार विद्यार्थ्यांनी मिळवली नोकरी

चंद्रपूर : राज्य शासन व टाटा टेक्नॉलॉजीच्या संयुक्त विद्यमाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर येथे २६३ कोटींचा खर्च करून सेंटर फॉर इनव्हेंशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग ( CIIIT ट्रेनिंग ) प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

Recommended read: चंद्रपूरात शिवसेनेचे रामदास कदम याचा प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

या प्रकल्पांतर्गत औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हावे याकरिता ९ स्टेट ऑफ आर्ट प्रयोगशाळा विकसित केल्या आहेत. या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प शुल्कामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अल्प मुदतीचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुधीर आकोजवार यांनी दिली.

राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून टाटा टेक्नॉलॉजीचा हा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे. अडीच हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या केंद्रातून प्रशिक्षण घेतले. कॅम्पस प्लेसमेंट अंतर्गत २०२१-२२ मध्ये ३६५ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपनीत नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.

Recommended read: आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन चंद्रपूरात आयोजित होणार भव्य माता महाकाली महोत्सव

टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टाटा मोटर्स, अदानी पॉवर, टीटीएल, अदानी इंन्टरप्राईजेस, धुत ट्रान्समिशन, बाईजूस, टेक महिंद्रा, अशोक लेलॅन्ड इत्यादी कंपनीत ३ ते १० लाख रुपये पॅकेजच्या नोकरी प्राप्त झाल्या आहेत. दोन विद्यार्थ्यांची कार्यकारी अभियंता पदावर निवड झाली आहे.

आता ‘बीई’ ऐवजी ‘बी.टेक.’

पदवीतंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या मान्यतेने संस्थेतील विद्यार्थ्यांना २०२२-२३ या शैक्षणिक सत्रापासून बीई बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगऐवजी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. अशा पद्धतीची पदवी देणारे हे एकमेव महाविद्यालय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!