चंद्रपूर: शेत जमिनीचे फेरफार करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत सिद्ध झाल्याने सास्ती साज्याच्या तलाठी दिपाली भडके हिला ताब्यात घेण्यात आले आहे.

सोमवार २५ जुलै ला दुपारी ४ वाजता ही कारवाई सास्ती येथील ग्रामपंचायत प्रांगणात असलेल्या तलाठी कार्यालयात चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. गेल्या आठवड्यात तालुक्यातील वरूर रोड येथील विनोद गेडाम या तलाठ्याला लाचेची मागणी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

Recommended read: संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा

तक्रारकर्त्या शेतकऱ्याने सास्ती शिवारात एक शेत खरेदी केले होते. त्यांनी खरेदी विक्रीचे सर्व कागदपत्रे देऊनही तलाठी दिपाली भडके यांनी फेरफार करण्यास विलंब करीत २० हजार रक्कमेची मागणी केली. फिर्यादीला फोन द्वारे मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात रीतसर तक्रार केली.

Recommended read: लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल

सर्व प्रकरणाची पळताळणी करून आज सास्ती येथील महिला तलाठी यांना फेरफार प्रकरणात आगाऊ पैसे मागितल्याच्या आरोपावरून चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी तलाठी हिला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. बातमी लिहिपर्यत कारवाई सुरू होती.

दोन आठवड्यात दोन तलाठ्यांवर एसीबी ची कार्यवाही झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!