ताडोबा बफर क्षेत्रात दिवसभर व्याघ्रसफारी

प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवणार

ताडोबा बफर क्षेत्र : मार्ग निश्चितीनंतर पर्यटन

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव पर्यटनाला अधिक चालना मिळावी, यासाठी ताडोबा बफर झोनमध्ये दिवसभर पर्यटन सफारी सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असून ताडोबात एकमेकांशी जोडलेल्या मार्गांवर सफारी सुरू करण्याचा विचार आहे.

ताडोबा व्यवस्थापनाने एकाच मार्गावर मोहर्ली बफरमधील मोहर्ली-आडेगाव-देवाडा-आगरझरी-जुनोना यांचा समावेश आहे. ताडोबा कोअर क्षेत्रात पूर्णवेळ सफारी सुरू झाली असून ३५ हजार रुपये शुल्क आहे. बफरसाठी ४५ हजार शुल्क आकारले जाणार आहे.

Recommended read: चंद्रपुरातील OYO हॉटेलमध्ये वेशाव्यवसाय, एलसीबीची धाड

ताडोबामध्ये दिवसभर सफारी सुरू करण्याचा निर्णय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने ७ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत घेतला आहे. ताडोबा बफर चे उपसंचालक कुशाग्र पाठक हे ताडोबात दिवसाची सफारी कशा पद्धतीची असणार आहे, याची कार्यपद्धती तयार करणार आहेत. हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर असून ताडोबा प्रशासनाने सफारीचे मार्ग निश्चित केल्यानंतरच सफारीला सुरुवात होणार आहे. सफारीचे प्रवेश शुल्क लवकरच निश्चित केले जाणार आहे.

Recommended read: जीर्ण इमारत कोसळून महिला जंखमी झाल्यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेला जाग

ताडोबा बफर झोनमध्ये १३ प्रवेशद्वार आहेत आणि सफारी मार्ग बहुतेक एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे कोलारा-मदनापूर-बेल्लारा आणि अलिझंजा-नवेगाव-निमढेला या मार्गात अशी सफारी राबवली जाण्याची शक्यता आहे. सध्या, ताडोबा कोअरमध्ये एक दिवसभर चालणारी सफारी भारतीय पर्यटकांसाठी ४५ हजार रुपये आहे. त्यात प्रवेश, वाहन आणि मार्गदर्शक शुल्क समाविष्ट आहे. परदेशी पर्यटकांसाठी ५५ हजार रुपये मोजावे लागतात.

Recommended read: सीबीआय कडून कोळसा खाणीच्या व्यवस्थापकाला ५० हजारांची लाच घेताना अटक

ताडोबा प्रशासनाने अडेगाव-देवाडा-आगरझरी मार्ग ओळखला आहे. हा मार्ग सुमारे ८०-१०० किमीचा आहे. पर्यटक सकाळपासून संध्याकाळपर्यंत सफारीचा आनंद घेऊ शकतील आणि आगरझरी मध्ये मुक्काम देखील करू शकणार आहे. लवकरच निर्णय लागू होण्याची शक्यता आहे.

या निर्णयाचे स्वागत असून यामुळे ताडोबा प्रशासनाला मोठा महसूल मिळणार आहे. अडेगाव-देवाडा-जुनोना-आगरझरी मार्गावर हॉटेल, रिसोर्टला चालना मिळणार आहे. स्थानिकांनाही या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे एका हॉटेल व्यावसायिकांने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!