दोन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश- IG Medias Chandrapur

२० लाखाचे होते बक्षीस

गडचिरोली : २० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी दाम्पत्य दीपक ऊर्फ मुन्शी रामसु ईष्टाम (३४) व शामबत्ती नेवरू आलाम (२५, रा. हिदवाडा पोस्टे ओरच्छा जि. नारायणपूर (छ.ग.) चे होते. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर दोन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण केले.

दीपक ईष्टाम व शामबत्ती आलाम हे दोघे पती- पत्नी असून ते दोघेही प्लाटून क्र. २१ मध्ये कार्यरत होते. दीपक हा डीव्हीसी पदावर तर शामबत्ती आलाम ही प्लाटून सदस्य म्हणून कार्यरत होते. दीपक याच्यावर खुनाचे ३, चकमकीचे ८, जाळपोळ २ असे गुन्हे दाखल आहेत. जुलै २००१ मध्ये तो कसनसुर दलम सदस्य पदावर भरती झाला होता.

Recommended read: CDCC बॅंकेतील आर्थीक घोटाळयांची सखोल चौकशी करावी – भाजपाची मागणी

ऑक्टोबर २००१ ते नोव्हेंबर २००२ पर्यंत चामोर्शी दलम सदस्य पदावर कार्यरत होता. ऑक्टोबर २००४ पर्यंत तो सीसीएम देवजी यांचे प्रोटेक्शन गार्डमध्ये कार्यरत होता. नंतर २००६ पर्यंत कंपनी क्र.१ मध्ये ए सेक्शनमध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता. त्यानंतर २००९ ते २०१५ पर्यंत कंपनी क्र.१ ए प्लाटून कमांडर पदावर व त्यानंतर २०१५ ते आजपर्यंत प्लाटून क्र. २१ मध्ये डीव्हीसी पदावर कार्यरत होता.

नक्षलमध्ये कार्यरत असताना त्याने विविध ठिकाणी ६ अॅम्बुश लावले होते. त्याने लावलेल्या अॅम्बुशमध्ये छत्तीसगडमधील कुदुरघाटी ४, झाराघाटी २, कांगेरा २५ असे एकूण ३१ जवान शहीद झाले. पत्नी शामबत्ती हिच्यावर चकमकीचे २ असे गुन्हे दाखल असून, २०१५ मध्ये ८ महिने जनमिलीशियामध्ये व त्यानंतर प्लाटुन क्र.१६ मध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत प्लाटुन क्र. २१ मध्ये कार्यरत होती.

दोन नक्षलवाद्यांवरचे बक्षीस

दीपक याच्यावर १६ लाख रुपयाचे तर शामबत्ती आलाम हिच्यावर ४ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. दोन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण केल्यामुळे पुनर्वसनाकरिता शासनाकडून दीपक यास ६ लाख रुपये व शामबत्ती आलाम हिला २.५ लाख रुपये तसेच पती- पत्नीने एकत्रित आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त १.५ लाख असे एकुण १० लाख रुपये तसेच इतर योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

नक्षलींचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाचे सपोनि बाबासाहेब दुधाळ यांनी पार पाडून मोठी भूमिका बजावली आहे.

टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर दोन जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालींवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.

2 thoughts on “दोन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!