भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत नक्षलवादीचा समावेश

गडचिरोली: नक्षलवादी सामान्य आदिवासींची हत्या करीत भिती व दशहत पसरविण्याचे काम करीत असतानाच आज बुधवारी १२ लाखाचे बक्षीस असलेल्या माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी (३४) व भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम (६३) या दोन जहाल नक्षलवादी यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले. टीसीओसी कालावधीच्या पाश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी आहे.

Recommended read: राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)च्या विशेष कोर्टानं टेरर फंडिंग प्रकरणात यासिन मलिक ला जन्मठेपेची शिक्षा ,कोण आहे यासिन मलिक, जाणून घ्या सविस्तर

आत्मसमर्पीत नक्षलवादी रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम हा मार्च 2005 ला अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत झाला. तीन महिने पेरमिली मध्ये कार्यरत होता. मे २००५ पासुन तो माड डिव्हीजन टेक्नीकल दलममध्ये कार्यरत होता. २००७ ते २०१२ पर्यंत उप-कमांडर पदावर कार्यरत होता. २०१२ ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर पर्यंत कार्यरत होता. रामसिंग यांचेवर १ खून, 1 चकमक व इतर 1 असे एकुण 3 गुन्हे दाखल आहेत. मौजा कासमपल्ली, गुंडुरवाही, हीकेर, आशा-नैनगुडा, आलदंडी चकमकीत तो सहभागी होता.

माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी ही नोव्हेंबर २००२ ला कसनसुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन ती माहे डिसेंबर २०१२ पर्यंत कार्यरत होती. डिसेंबर २०१२ ते 2013 पर्यंत भामरागड दलममध्ये कार्यरत होती.फेब्राुवारी 2013 ते माहे एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. माधुरी हीचेवर 4 खून, 21 चकमक, 7 जाळपोळ व इतर 5 असे एकुण 37 गुन्हे दाखल आहेत. मौजा वेळमागड, कसनासुर व माडवेली चकमकीमध्ये सहभागी होती.

Recommended read: चंद्रपुरात युवकाचा निर्घृण हत्या

शासनाने रामसिंग ऊर्फ सिताराम आत्राम याचेवर ६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन मट्टामी हिचेवर ६ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.नक्षलवादीनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल यांनी केले आहे.

One thought on “बारा लाखाचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवादी चे आत्मसमर्पण”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!