नक्षलवाद्यांची गळफास

गडचिरोली: दोन वर्षांपूर्वी पोलिसांपुढे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल ८ मार्चला उघडकीस आली. नकुल मडावी (३५) असे मृत आत्मसमर्पण नक्षलवाद्याांचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

Recommended read: कदम रुग्णालय येथील अवैध गर्भपात प्रकरणामुळे सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची झाडाझडती

नकुल मडावी व त्याची पत्नी दोघेही नक्षल चळवळीत कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी दोघांनीही गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर ते गडचिरोलीनजीकच्या नवेगाव येथे पोलिसांनी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची उभारलेल्या नवजीवन वसाहतीत वास्तव्य करीत होते. त्यांना तीन मुले आहेत. मोलमजुरी करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. परंतु काल नकुलने वसाहतीमागे असलेल्या जंगलातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मात्र, मी आत्महत्या करतो, असे तो नेहमी म्हणत असल्याचे त्याच्या पत्नीने सांगितल्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांनी सांगितले.

2 thoughts on “आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची गळफास घेवून आत्महत्या”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!