आ. सुधीर मुनगंटीवार यांनी साधला युक्रेनवरून आलेल्या विद्यार्थी सोबत संवाद

भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर च्या पदाधिकऱ्यांनी दिली निवास्थानी भेट

युक्रेन व रशिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी केंद्रातील नरेंद्र भाई मोदी सरकार ने अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून विद्यार्थ्यांना भारतात परत आणले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी युक्रेनवरून आलेल्या विद्यार्थी सोबत संवाद साधला.

Recommended read: सीटीपीएस मधील प्रशिक्षणार्थी भरती प्रक्रियेची चौकशी करणार – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

चंद्रपूर जिल्ह्यातील 11 विद्यार्थी परतले असून त्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना घरी सुखरूप पोहचविण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरातील धीरज असीम बिस्वास हा युक्रेन येथे वैदकिय अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे तो युक्रेन वरून परत आला असून भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर च्या पदाधिकऱ्यांनी उत्तमनगर बंगाली कॅम्प येथे त्यांच्या निवास्थानी भेट दिली त्यादरम्यान महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रमणध्वनी वर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व आरोग्याची विचारपूस या दरम्यान केली. तसेच भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी धीरज ला लागणाऱ्या प्रशासकिय मदतीसाठी भारतीय जनता पार्टी सदैव सोबत राहील असे त्यांच्या परिवाराला हमी दिली.

यावेळी सदर भेटी दरम्यान महामंत्री रवींद्र गुरनुले,सचिव चंदन पाल,बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ.दीपक भट्टाचार्य,नगरसेवक सोपांन वायकर, भारतीय जनता युवा मोर्चा सचिव सतीश तायडे व धीरज बिस्वास त्यांच्या आई मिनाक्षी बिस्वास तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते

One thought on “आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी साधला युक्रेनवरून आलेल्या विद्यार्थी सोबत संवाद”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!