गडचिरोलीत दहा दिवसात दुसरी कारवाई

गडचिरोली: चामोर्शी तालुक्यात अल्पवयीन मुलींचा होत असलेला बालविवाह जिल्हा बाल संरक्षण पथक व आष्टी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत वर व वधु पक्षांना एकत्र बोलावून १८ वर्ष होईपर्यंत विवाह करणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्यात आले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.

Recommended read: चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

दहा दिवसापूर्वी गडचिरोलीत शहरातसुध्दा एक १५ मुलींचा बालविवाह थांबविण्यात आला होता.चामोर्शी तालुक्यात एक बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण पथक व पोलीस स्टेशन आष्टी यांनी मिळाली. सदर बाल विवाह रोखण्याकरीता पोलिस व बाल संरक्षण पथकाने विवाहस्थळ गाठून मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर वर पक्ष व वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्यानुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित सर्वांना माहिती देण्यात आली.

Recommended read: १५ वर्ष वयाच्या बालिकेचा बालविवाह थांबविण्यात यश

बालिकेचे १८ वर्ष होइपर्यंत विवाह करणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्यात आले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले. सदर कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, पोलिस स्टेशन आष्टीचे पोलिस निरीक्षक गणेश पी.जंगले, सामाजिक कार्यकर्ता जयंत जथाडे, दिनेश बोरकुटे सामाजिक कार्यकर्ते, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, भारती जवादे चाईल्ड लाईन टीम मेंबर, सरपंच मालाताई मेश्राम, ग्रा.प.सदस्या शकुंतला नेवार, पोलीस पाटील सदाशिव नैताम, अंगणवाडी सेविका बैनाबाई मडावी यांनी बाल विवाह थांबविला.

One thought on “बालविवाह थांबविण्यास बाल संरक्षण पथक व पोलिसांना यश”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!