जिल्हा बाल संरक्षण पथक व गडचिरोली पोलिसांची बालविवाह कायदा अंतर्गत कारवाई

गडचिरोली: गडचिरोली शहरातील तेली वार्डात होणारा १५ वर्ष ४ महिने वय असणाऱ्या बालिकेचा बालविवाह थांबवण्यात जिल्हा बाल संरक्षण पथक व गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. दरम्यान बालिकेच्या कुटूंबाचे समुपदेशन केल्यानंतर मुलीच्या आईकडून मुलीचे वय १८ वर्ष होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नसल्याचे हमी पत्र लिहून घेण्यात आले आहे.

Recommended read: बारा लाखाचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवादीचे आत्मसमर्पण

२६ मे २०२२ ला गडचिरोली शहरातील तेली वार्डात एक बालविवाह होणार आहे अशी तक्रार पोलीस स्टेशन गडचिरोली येथे करण्यात आली होती. पोलीस पथक, जिल्हा बाल संरक्षण पथक, व चाईल्ड लाईन पथकांने बालविवाह रोखण्याकरीता बालिकेचे घर गाठले व बालकाची जन्म पुरावा तपासणी करून ,बालिका १८ वर्षाखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच बालिकेचे व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले. मुलिकडचे व मुलाकडचे हे दोन्ही मंडळी सुध्दा गडचिरोली शहरातील असून त्यांचा बाल विवाह दुसऱ्या दिवशी गडचिरोली येथे होणार होता.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले यांनी बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायदा नुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित कुटूंबातील सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर बालिकेच्या आईकडून मुलीचे वय १८ वर्ष होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नसल्याचे हमी पत्र लिहून घेण्यात आले आहे.

Recommended read: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त 31 मे रोजी पंतप्रधानांचा लाभार्थ्यांशी संवाद

सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, तसेच पोलीस स्टेशन गडचिरोलीच्या सहायक पोलीस निरीक्षक पूनम गोरे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, दिनेश बोरकुटे जिल्हा समन्वक चाईल्ड लाईन, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर qलेनगुरे, सामजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, अविनाष राऊत चाईल्ड लाईन टीम मेंबर यांनी ही कारवाई केली आहे.

2 thoughts on “१५ वर्ष वयाच्या बालिकेचा बालविवाह थांबविण्यात यश”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!