सोमय्या पॉलिटेक्निक काॕलेज चा प्राचार्यांनाजाब विचारायला गेलेल्या शिवसैनिकाकडून प्राचार्यांना मारहाण

चंद्रपूर: कॉलेज चा इमारतीवरून उडी घेऊन विध्यार्थीनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरातीर सोमय्या पॉलिटेक्निक काॕलेज मध्ये घडली.

बारावीचे शिक्षण घेणारी ही विध्याथ्रीनी निट परीक्षेची तयारी करीत होती. प्रकरण दडपणाऱ्या संस्थेविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांनी महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण केली.

Recommended read: निर्दयी बाप अवघ्या सात दिवसाच्या मुलीला रस्त्यात टाकून पळ काढतो तेव्हा…

शहरातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या सोमय्या कॉलेजच्या इमारतीवरून विद्यार्थिनीने उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. शनिवारी सोमय्या कॉलेज व पॉलिटेक्निक येथील बारावीत शिकणारी विध्यार्थीनी निट परीक्षेची तयारी करीत होती. तिने महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली.

जखमी अवस्थेत असलेल्या विध्यार्थीनीला शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर उपचारासाठी नेण्यात आले. नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माही आहे.

Recommended read: वनविभागाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी केली वाघाच्या पंजाची चोरी

घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. घटनेची माहिती शिवसैनिकांना मिळताच शिवसैनिक सोमय्या कॉलेजात दाखल झालेत. घटनेला प्राचार्यांना जबाबदार ठरवून मारहाण केली. याबाबत सोमय्या काॕलेजतील प्राचार्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. प्रकरण बाहेर निघणार नाही. याची पुर्ण काळजी घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!