संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली: सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची माहिती , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

श्री. शिंदे दिल्ली भेटीवर होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण समारंभात ते आज सहभागी झाले. यानंतर महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली. संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी तसेच महाराष्ट्र सदनात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीसाठी राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन आपणास निवेदन दिल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

Recommended read: महावितरणच्या गलथान कारभारामुळे विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

इंडिया गेट परिसरात बांधण्यात येत असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यात यावी या संदर्भात आपण स्वत: आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून या मागणी संदर्भात निवेदन देणार असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या मागणीबाबत पंतप्रधान महोदय सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात बाळासाहेबांचा पुतळा बसविण्याची मागणीही राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केली असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

Recommended read: देशी कट्टा व पिस्टल शस्त्रासह आरोपीला अटक

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र सदनात निवास व्यवस्था

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांची दिल्लीत राहण्याची गैरसोय होऊ नये या संदर्भात कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात तत्काळ 100 ते 150 उमेदवरांच्या निवास व्यवस्थेसह येत्या काळात या सदनातील भूखंडावर 500 ते 600 उमेदवारांची व्यवस्था करण्यासंदर्भात आरखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!