ओबीसी च्या संविधानिक न्याय मागण्यासाठी ७ मार्चला चक्का जाम आंदोलन

राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरु करणे

५० विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देणे व पोलीस भरती आदी निर्णय

चंद्रपूर : मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने कळविल्या प्रमाणे मंगळवार दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी वसतीगृह, ओबीसी विद्यार्थ्यांना परदेसी शिष्यवृत्ती व पोलीस भरती बाबत घेतलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत करण्यात आले आहे.

Recommended read: बाधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई साठी तालाठीकडे बँक खाते क्रमांक जमा करण्याचे आवाहन

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार. तथा इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार.

Recommended read: एकाच कुटुंबातील चौघांचा सामूहिक आत्महत्याचा प्रयत्न

२० हजार पोलिस पदभरती

पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट देवून एकूण वीस हजार पदे गृह विभागातर्फे भरणार, आदी निर्णय राज्य सरकारने आज (दि.२७) ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले.

Recommended read: हर हर शंभू गाण्याची सुप्रसिध्द गायिका अभिलिप्सा पांडा येणार चंद्रपूरात

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात मागील अनेक वर्षापासून इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांकरीता वसतीगृहे, परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व पोलीस भरती याकरीता विविध आंदोलने केलीत व राज्य सरकारकडे मागणीचा रेटा लावून धरला होता.

Recommended read: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपी अटक!

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या निर्णयाबद्दल सरकारचे मानले आभार

अनेकदा निव्वळ आश्वासनाव्यतिरीक्त ओबीसींना काहीही प्राप्त झाले नाही. मात्र आता राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतल्याने इतर मागास प्रवर्गातील ( OBC ) विद्यार्थ्यांमध्ये आनंद झाला आहे व राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!