युक्रेनमधून चंद्रपूरचे सहा विद्यार्थी स्वगृही परतले

युक्रेन: आठही जणांना भारतात आणण्यासाठी युध्दस्तरावर प्रयत्न सुरू


चंद्रपूर, गडचिरोली
: युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सहा व गडचिरोली जिल्ह्यातील दोन विद्यार्थिनी युक्रेनमधील एका शहरात अडकल्या आहेत. त्यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील हर्षल बलवंत ठावरे हा विद्यार्थी युक्रेनमधील टारनोपोईल राज्यात एमबीबीएस द्रितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे ही पाच वर्षीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. नेहा शेख ही वैद्यकीय शिक्षणासाठी झापोरोझीया या शहरात आहे. तर आदिती अनंत सायरे, धीरज असीम बिश्वास व दिक्षराज अकेला हे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन येथे आहेत. हे सर्व जण युक्रेन येथे भाड्याच्या घरात वास्तव्याला आहेत. या सर्वांशी संपर्क झाला असून त्यांना इतर देशातून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा तर गडचिरोलीतील दोन विद्यार्थी सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत.

Recommended read: घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पाणीपुरवठा व पथदिव्यांची थकबाकी ४५५ कोटी ९४ लाखात घरात

दिव्यानी सुरेश बांबोळकर आणि स्मृती रमेश सोनटक्के अशी गडचिरोली शहरातील या विद्यार्थिनींची नावे आहेत. दोघीही युक्रेनची राजधानी कीव्ह शहरापासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावरील व्हिनित्सिया येथील व्हिनित्सिया नॅशनल युनिव्हर्सिटीत एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. दिव्यानी ही एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला, तर स्मृती प्रथम वर्षाला आहे. दिव्यांनी ही आपल्या मैत्रिणीसह व्हिनित्सिया शहरातील एका भाड्याच्या खोलीत राहते, तर स्मृती ही वसतिगृहात राहत आहे. गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर युद्धांचे सावट असल्याने स्मृती सोनटक्के हिने ४ मार्चच्या विमानाचे तिकीट काढले होते. मात्र युद्ध सुरू झाल्याने सर्व विमाने बंद झाली आहेत.

Recommended read: अमृत कला आणि क्रीडा महोत्सवातून विद्यापीठाचा नावलौकिक करावा- धनाजी पाटील , अतिरिक्त जिल्हाधिकारी

शिक्षणासाठी युक्रेनमध्ये नेणाऱ्या कंत्राटदाराने भोजन व अन्य जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करून ठेवण्याचा निरोप विद्यार्थ्यांना दिला आहे. त्यानुसार त्यांनी सर्व वस्तूंची जमवाजमव करून ठेवली आहे. परंतु परिस्थिती आणखी चिघळत असल्याने आणि विमाने बंद असल्याने वसतिगृहातील सर्व विद्यार्थी भयभीत झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि त्याचे कंत्राटदार भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याची माहिती प्रा. रमेश सोनटक्के यांनी दिली. दोन्ही विद्यार्थिनी सुरक्षित असल्या तरी युद्धांमुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत

One thought on “चंद्रपूर जिल्ह्यातील सहा तर गडचिरोलीतील दोन वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थि युक्रेनमध्ये अडकले”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!