शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, माजी आमदार विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना घेऊन बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गोठात हालचालींना वेग आला. शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी करत त्यांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Recommended read: इंग्लडच्या पंतप्रधान निवडणूकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे ऋषी सुनक आघाडीवर

अनेकांना पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षाचे सदस्यत्व रद्द करत पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे. या सर्व आमदाराचा फैसला 18 जुलैला होणार आहे.

Recommended read: गावाभोवती चौफेर पूर, पोटच्या पोराला मेंदूज्वर आणि नावेतून रूग्णांलयात नेण्याचा तो थरार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे

विजय शिवतारे यांनी गुरु पोर्णिमेच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली होती आणि भेटिचे फोटो व्टिटरवर अपलोड केले होते यावर पक्षाविरुध्द कारवायाचा ठपका ठेवत विजय शिवतारेंची हाकलपट्टी केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटासोबत जवळीक साधत असलेल्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!