राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

इतरांना खात्यांचे फेरवाटप

मुंबई: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांन घेवून बंड केले आहे. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. शिवसेना ॲक्शन मोडमध्ये दिसली असून बंडखोर शिवसेना मंत्र्यांचे खाते काढून इतरांना देण्यात आले आहे.

Recommended read: लाच घेतांना महावितरणच्या सहायक अभियंत्यास अटक

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

Recommended read: आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

बंडखोर इतरही मंत्र्यांचे खाते काढून मुख्यमंत्री ठाकरे यांनी इतरांना वाटप केले आहे.

खाते दुसऱ्यांला दिल्याबद्द अभिनंदन – दीपक केसरकर
गुवाहाटी येथे असलेल्या मंत्र्यांचे मंत्रिपद काढून दुसऱ्याला दिल्याबद्दल आम्ही उद्धवजी ठाकरे यांचे अभिनंदन करतो असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

One thought on “शिवसेना ‘ॲक्शन’ मोडमध्ये, बंडखोर शिवसेना मंत्र्यांचे खाते मुख्यमंत्र्यांनी काढले”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!