शिवसेना जिल्हा प्रमुखाकडून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांस मारहाण- IG Media Chandrapur News

शिवसेना जिल्हाप्रमुखासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

शिवसेना जिल्हा प्रमुखाकडून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांस मारहाण
शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे

चंद्रपूर: वरोरा शहरामध्ये असलेल्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांला शिवसेना जिल्हाप्रमुखाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मनाई केल्यावरही या टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ देता? या कारणावरून ही मारहाण करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर शिवीगाळ, हातबुक्क्याने मारहाण करणे आणि नुकसानीची धमकी देण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Recommended read: अनैतिक देहव्यापार अड्यावर पोलिसांची धाड

काही दिवसापूर्वी वरोरा शहरातून कोळसा कंपन्यांच्या ट्रकांना मनाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. तालुका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत टोक नाक्यावरून जड वाहतूक करण्यास मनाई आदेश काढले होते. मात्र, प्रशासनाने मनाई आदेश जारी केेला असतांनासुध्दा या टोल नाक्यावरून वरोरा शहरात जड वाहतूक होत होती. ही बाब ग्रामीण जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या लक्षात येताच त्यांनी कार्यकर्त्यना घेवून टोल नाक्यावर जावून तेथील एका कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लावली. दरम्यान टोल प्रशासनाने वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून मारहाण आणि शिविगाळ केल्याप्रकरणी जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!