सुंगधित तंबाखू पुरवठादारांवर मोक्का लावणार – मंत्री संजय राठोड

अन्न औषण प्रशासनात ४०० हून अधिक पदे रिक्त

चंद्रपूर: राज्यात गुटखा व सुंगधित तंबाखूवर बंदी असतांना चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुंगधित तंबाखू येत आहे. सुंगधित तंबाखूचे मोठे पुरवठार जिल्ह्यात सक्रीय झाले आहे. त्यामुळे एकादा कारवाई झालेल्या पुरवठादारांवर मौका लावण्याचा निर्णय आपण लवकरच घेणार आहे व शिंदे गटच खरी शिवसेना असे अन्न व औषध मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Recommended read: चंद्रपूरात पहिल्यांदाच श्री माता महाकाली महोत्सव

राठोड हे हिंदू शिवगर्जना यात्रेनिमित्त चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला खा. कृपाल तुमाने, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव, जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, जिल्हा संपर्कप्रमुख बंडू हजारे उपस्थित होते.

हिंदू शिवगर्जना यात्रेनिमित्त चंद्रपूरात आलो आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याला मोठ्या उत्साहाने पार पडला आहे. चंद्रपूर जिल्हाप्रमुख म्हणून नितीन मत्ते व संपर्कप्रमुख म्हणून बंडू हजारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Recommended read: गडचिरोली पोलीस – नक्षल चकमक

वनमंत्री असतांना माझ्यावर अनेक आरोप झाले. त्यामुळे मी स्वत:हून मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यासाठी उध्दव ठाकरे किंवा इतर कुणाचा दबाव नव्हता.

राज्यातील अन्न व औषण प्रशासनामध्ये ४०० हून अधिक रिक्त पदे आहेत. अन्न व औषण प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी रिक्त पदे भरण्याचा निर्णय लवकरच राज्य सरकार घेणार आहे.

Recommended read: कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नंतर ही पत्नी झाली गर्भवती

चंद्रपूरात सुंगधित तंबाखूचे मोठे व्यापारी व पुरवठादार तस्करी करीत असल्याचे निर्दशनास आले आहे. एक-दोनदा कारवाई झालेल्या पुरवठादारावर सरळ मौका लावण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार असल्याचे राठोड यांनी यावेळी सांगितले.

मुळ शिवसेनेसोबत उठाव करून अनेक आमदार व खासदार शिंदे गटात दाखल झाले आहे. उर्वरित खासदार येत्या सहा महिण्यांतच शिंदे गटात सामील होईल असे सूचक व्यक्तव्य रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले.

शिंदे गटच खरी शिवसेना

उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, आम्हची शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. आम्ही कधीही शिवसेनेतून बाहेेर पडलो नाही. कोणत्या दुसऱ्या पक्षात गेलो नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा आपल्या जाहीर भाषणातून काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत जाणार नसल्याची भूमिका मांडली होती.

उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही सर्व गप्प होतो. आता मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनात आमचा उठाव झाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!