राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एसटी संपावर तोडगा काढा - IG Media Chandrapur

एसटी संपावर आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे सरकारकडे मागणी

मुंबई : राज्यात गेल्या १५२ दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या एसटी संपावर महाविकास आघाडी सरकारने पक्षीय राजकारण व राजकीय अभिनिवेश बाजूला सारून, तातडीने सन्मानजनक तोडगा काढावा आणि ग्रामीण भागाच्या जीवन वाहिनीला पुन्हा गती द्यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

Recommended read: ज्या व्यक्तीने आग लावली आहे ती आग मी विझविणार- सुधीर मुनंगनटीवार

२९ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यात विविध भागात सुरू झालेल्या या संपाने टप्प्याटप्याने गंभीर रूप धारण केले. संपावर तोडगा न निघाल्याने राज्यभरात आतापर्यंत ४५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. २८ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यातील यावल आगाराच्या शिवाजी पाटील या चालकाने रेल्वेखाली येऊन स्वतःचे जीवन संपविले ही घटना हृदय हेलावणारी आहे. हजारो कुटुंब य संपामुळे प्रभावित झाले असून सुमारे ६२ ते ६५ हजार एसटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई, उच्च न्यायालयात अवमान याचिका, कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करणे अश्या प्रकारच्या कारवया राज्य सरकार करीत आहे.

One thought on “राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एसटी संपावर तोडगा काढा”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!