अवकाशातून पडलेली वस्तू सॕटेलाईटची मोठी रिंग , अभ्यासकांचा दावा

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयाचा आकाशात शनिवारला पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या जळत्या वस्तू दिसल्या. सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे रात्री 10 वाजताचा सूमारास 8 ते 10 फुटाची लोखंडी रिंग पडली.ही रिंग म्हणजे सॕटेलाईटचा एखादा तुकडा असावा, असा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला आहे. दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गुंजेवाही जवळ गोल आकाराचा अवशेष नागरिकांना मिळाला आहे.सदर अवशेष हा हायड्रोजन टॅंक असल्याचे दिसून येत आहे.

Recommended read: भारतात टीबी ( TB ) आजारावरील पहिली लस विकसित

चंद्रपूर जिल्ह्यातील आकाशात शनिवारला लाल पृथ्वीच्या दिशेने येणारा लाल प्रकाश दिसून आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी, धाबा, हिवरा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी, राजुरा या परिसरात हा प्रकाश दिसून आला.अनेकांनी विडीओ,फोटो समाजमाध्यमा व्हायरल केले अन याची चर्चा रंगली.

ही चर्चा सूरू असतांनाच सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावात रात्री 10 वाजताच्या सुमारास सँटेलाइटची 8 ते 10 फुटाची लोखंडी रिंग पडल्याने एकच खळबळ उडाली. रिंग बघण्याकरीता लोकांनी एकच गर्दी केली.ही रिंग पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

सॕटेलाईटची मोठी रिंग

दरम्यान आज सकाळी सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गुंजेवाही जवळ गोल आकाराचा अवशेष नागरिकांना मिळाला आहे.सदर अवशेष हा हायड्रोजन टॅंक सारखा दिसत असून त्याचा उपयोग सॅटेलाईट मध्ये उपकरण सिस्टीम मध्ये उपयोग केल्या जातो.

2 thoughts on “अवकाशातून पडलेली वस्तू सॕटेलाईटची मोठी रिंग , अभ्यासकांचा दावा”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!