रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर वतीने नृत्य स्पर्धेचे आयोजन

चंद्रपूर: रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर तसेच नीत डान्स व फिटनेस स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२२ ला स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात नृत्य स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे माजी अध्यक्ष विजय आईंचवार, एन.डी.ए फ. चे संचालक सरोज ढवस, नित रोहने यांच्या हस्ते झाले.

Recommended read: राज ठाकरेंच्या चंद्रपूर दौऱ्यानंतर मनसेत मोठे फेरबदल

नृत्य स्पर्धेत ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक नागपूरच्या कुणाल मोहोड यांनी पटकाविले तर द्वितीय पारितोषिक गोंदियाचे हाय सिविलियन ग्रुप ने पटकाविले तर तृतीय“ पारितोषिक नागपूरचे हर्षद मेश्राम यांनी पटकाविले आहे. सर्व विजेत्यांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.

Recommended read: ट्रकच्या धडकेत महिला ठार, संतप्त जमावाने १० ट्रक पेटवले

यावेळी प्रियदर्शनी सहभागृह हाऊसफुल्ल झाले होते. स्पर्धेला रोटेरियन, इनरविल सदस्य, रोट्रॅक्टर्स तसेच शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

प्रकल्प संचालक रोटेरियन संजय ढवस यांनी या संपूर्ण स्पर्धेची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सदर स्पर्धा रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष रोटेरियन अजय जयस्वाल, सचिव संतोष तेलंग यांच्या नेतृत्वामध्ये घेण्यात आला.

Recommended read: माफी मागा अन्यथा, न्यायालयात दावा ठोकू-मनसे

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन.डी.एफ. ग्रुपचे संचालक संजय ढवस व नीत रोहने यांनी अथक परिश्रम घेतले. संतोष तेलंग यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!