killer, mafia, gangster-4862601.jpg


नागभीड : बोलेरो वाहनाने तळोधीकडून नागभीडकडे येणाऱ्या वाहनचालकास देशी कट्ट्याचा धाक दाखवून लूटमार केल्याची घटना तालुक्यातील चिंधीमाल फाट्यावर घडली. या प्रकाराने रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या वाहनचालकांत दहशत निर्माण झाली आहे.

Recommended read: गडचांदूरच्या रंचोनी बनविली इलेक्ट्रिक स्कूटर

लीलाधर चंद्रज्योती लांजेवार (२१ ) असे या घटनेतील फिर्यादीचे नाव असून तो नागभीड येथील रहिवासी आहे. लांजेवार यांनी नागभीड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २३ जानेवारीच्या रात्री १० च्या सुमारास ते तळोधी येथून औषधीने भरलेल्या बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३३ टी १३२१ या गाडीने नागभीड येथे येत असताना चिंधीमाल फाट्याजवळ तोंडाला काळे कपडे बांधलेल्या सहा व्यक्तींनी वाहन थांबवले. फिल्मी स्टाईलने त्याला गाडीतून खाली उतरवले त्यातील एकाने लोखंडी रॉडने त्याच्या उजव्या कानाच्यावर डोक्यावर मारून जखमी केले. दुसऱ्या व्यक्तीने देशीकट्टा दाखविला. तर तिसऱ्या व्यक्तीने खिशातून दहा हजार रुपये काढून लाथाबुक्क्याने मारहाण करून ते पसार झाले. फिर्यादीने लागलीच पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बारसागडे करीत आहेत.

One thought on “देशी कट्ट्याचा धाक दाखवून वाहनचालकाची लूटमार”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!