भरदिवसा पोलिस मुख्यालयासमोर चोरी, चड्डा ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांच्या व्यवस्थापकाला 12 लाखांनी लुटले

चंद्रपूर: चंद्रपुरातील प्रसिद्ध चड्डा ट्रान्सपोर्ट व्यवसायी यांच्या व्यवस्थापकाला चोरट्यांनी पोलीस मुख्यालयासमोर लुटल्याची धक्कादायक घटना शुक्रवार ल दुपारच्या सुमारास घडली.

Recommended read: मराठी वेबविश्वाला हादरून टाकणारा ‘रानबाजार’ ( Ran Bazar ) चा ट्रेलर रिलीज

चड्डा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यांच्या व्यवस्थापकाने पोलीस मुख्यालय समोर स्थित HDFC बँकेतून 12 लाख रुपये काढले. पैसे काढल्यावर आपल्या चारचाकी वाहनाकडे परत आले असता काही अज्ञात युवकांनी तुमच्या चारचाकी वाहनाचे ऑइल लिक होत आहे असे सांगितले असता ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने खाली बघितले, याच संधीचा फायदा घेत त्या युवकांनी पैश्याची बॅग चारचाकी वाहनातून लंपास केली.

सदर युवक यांनी चेहरा झाकून ठेवला होता. व्यवस्थापकाने पैश्याची बॅग युवकांनी लंपास केल्यावर आरडाओरडा केला मात्र त्यांनी लगेच तिथून पळ काढला. विशेष म्हणजे पोलिस मुख्यालय समोर रामनगर पोलीस स्टेशन आहे, त्या परिसरात लुटमारीची घटना म्हणजे पोलिसांना आरोपीनी एक प्रकारचे आव्हान दिले आहे. घटनेतनंतर गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे पथकासह घटनास्थळ गाठून तपासाला सुरूवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!