काँग्रेस च्या बड्या नेत्यांच्या बारमध्ये धिंगाणा, एक जखमी

एकमेकांच्या तक्रारीवरून सात जणांवर गुन्हा दाखल

शहर पोलिस ठाण्यात तक्रार

चंद्रपूर : काँग्रेस च्या बड्या नेत्यांच्या बारमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालन्याच्या प्रकरणावरुन झालेल्या वादात एकजण जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास एनडी बारमध्ये घडली. सुबोध तिवारी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दोन्ही पार्टीच्या तक्रारीवरून एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला.

Recommended read: खुशखबर………पेट्रोल ५ रूपये तर, डिझेल ३ रूपयांनी स्वस्त

विशेष म्हणजे, हा बार काँग्रेस च्या बड्या नेत्यांचा आहे. बारमधील वेटरच्या तक्रारीवरून वासुदेव ठाकरे, सुबोध तिवारी व अन्य दोघांवर कलम 294, 323,506, 34 अन्वये तर भद्रावतीच्या वासुदेव ठाकरे यांच्या तक्रारीवरून बारमधील तिघांवर 324, 323, 504, 427, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघुवंशी कॉम्प्लेक्स येथील एनडी बारमध्ये भद्रावती येथील वासुदेव ठाकरे, सुबोध तिवारी व दोघेजण बुधवारी सायंकाळी बसले होते. यावेळी त्यांनी दारू ढोसून नाच गाणे सुरु केले तसेच शिवीगाळ केली. अशी तक्रार बारमधील वेटर कपिल चव्हाण यांनी शहर ठाण्यात केली.तर वासुदेव ठाकरे यांनी बारमधील तिघांनी मारहाण केली. यात सुबोध तिवारी गंभीर जखमी झाले. अशी तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये केली.

Recommended read: भारतात आढळला EMM negative दुर्मिळ रक्तगट

दोन्ही तक्रारीवरून दोन्ही पार्टीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी विष्णु नागरगोजे पुढील तपास करत आहेत.

2 thoughts on “काँग्रेस च्या बड्या नेत्यांच्या बारमध्ये धिंगाणा, एक जखमी”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!