मराठी वेबविश्वाला हादरून टाकणारा 'रानबाजार' ( Ran Bazar ) चा ट्रेलर रिलीज

तेजस्विनी पंडितचा बोल्डनेस पणा तर, प्राजक्ता माळीचा प्रणयक्रिया करतांना Ran Bazar चा टिझर रिलीझ झाल्याने मराठी वेबविश्वात खळबळ

मुंबई: बहुप्रतिक्षित मराठी वेबसीरिज रानबाजार’चा (Ran Bazar Web Series) खळबळ उडवून देणारा टिझर व ट्रेलरल रिलीज झाला आहे. रेगे’ आणि ठाकरे’ सारखे संवेदनशील विषय प्रभावीपणे हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी वेबसीरिजच्या रुपाने आपली नवी कलाकृती घेऊन पुन्हा सज्ज आहेत. या टिझर व ट्रेलरमध्ये तेजस्विनी पंडित हिचा बोल्डनेस पणा तर, प्राजक्ता माळीचा प्रणयक्रिया करतांना टिझर रिलीझ झाल्याने मराठी वेबविश्वात खळबळ उडाली आहे.

Recommended read: डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात* ९ ठार

टीआरपी व प्रसिद्धीसाठी मराठी वेबविश्वात अश्लिलता आणली जात आहे. मराठीतील या भव्य वेबसीरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी व अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली आहे. चार दिवसांपूर्वी या बोल्ड वेबसीरिजचे दोन टीझर रिलीज करण्यात आले होते. या टीझर्संनी मराठी कलाविश्वात खळबळ उडवून दिली होती. मराठीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेली प्राजक्ता माळी यांचा या वेबसीरिजमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे.

पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्यासह मोहन आगाशे, आणि सचिन खेडेकर हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेले सीन्स पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच एखाद्या मराठी वेबसीरिजमध्ये न्यूड सीन पाहायला मिळणार आहे.

Recommended read : प्रदर्शनापूर्वीच पल्याड या मराठी चित्रपटाला अनेक नामांकन

या सीरिजमध्ये तेजस्वी पंडितने आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड सीन दिला आहे. तर प्राजक्ता माळीचा देखील बोल्ड लूक पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये प्राजक्ताचा असा अंदाज पाहून प्रेक्षकांनी आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोज्वळ इमेज असलेली प्राजक्ता या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच अशा बोल्ड लूकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सध्या या वेबसीरिजचीच सगळीकडे चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर या वेबसीरिजची खूपच चर्चा आहे. Ran Bazar सिरीज २० मेला प्लॅनेट मराठी वर रिलीझ होणार आहे.

टीझर १: Ran Bazar official teaser 1

टीझर २: Ran Bazar official teaser 2

ट्रेलर : Ran Bazar official trailer

संशोधन: IG Media’s Team

One thought on “मराठी वेबविश्वाला हादरून टाकणारा ‘रानबाजार’ ( Ran Bazar ) चा ट्रेलर रिलीज”
  1. […] व्यवस्थापकाला 12 लाखांनी लुटले मराठी वेबविश्वाला हादरून टाकणारा &#821… डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!