शरद पवार यांच्या घरावरील षडयंत्रकारी हल्ल्याचा चंद्रपुरात निषेध - IG Media Chandrapur

राष्ट्रवादीचे नेते तथा ओबिसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात षडयंत्रकारी प्रवृत्ती चा निषेध

चंद्रपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील षडयंत्रकारी भ्याड हल्ल्या विरोधात स्थानिक जनता कॉलेज चौकात निषेध निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा ओबिसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन करत शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली.

Recommended read: इस्त्रोची टीम चंद्रपुरात दाखल

उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते. तसेच, कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटी देण्यासह त्यांच्यावर कारवाई न करण्याची सूचना एसटी महामंडळाला केली होती. पण, तरीही पुन्हा एसटी कर्मचारी आक्रमक झाले. शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचारी शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानात घुसले आणि घोषणाबाजी केली. हा न्यायालयाचा अवमान असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधातील षडयंत्र आहे.

देशातील ज्येष्ठ व जनसेवेसाठी झटत आलेल्या नेत्याच्या घरावर असा भ्याड हल्ला करणे पुरोगामी व सामाजिक सुधारकांचा वारसा जपणाऱ्या राज्यातील अशोभनीय घटना असून अशा घटनांचा व षडयंत्रकारी प्रवृत्ती चा तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले.

यावेळी संजय सपाटे, अशोक पोफळे, नितीन कुकडे, रवि देवाळकर, आरीफ शेख, संजय बर्डे, आशिष महातले, विनायक बोडाले, जोत्सना लालसरे, असलम सुरीया, मंजुळा डूडुरे, प्रशांत चहारे, विजय मालेकर, महेश यार्दी, प्रकाश बेंडले, किशोर ठाकरे, नितीन खरवडे, सचिन सुरवाडे, निर्दोष दहिवले, आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

One thought on “शरद पवार यांच्या घरावरील षडयंत्रकारी हल्ल्याचा चंद्रपुरात निषेध”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!