अनैतिक देहव्यापार अड्यावर पोलिसांची धाड

स्थानिक गुन्हे शाखाने केली तीन पिडीत मुलींची सुटका

चंद्रपूर: चंद्रपुर जिल्ह्यात सुरू असलेल्या अनैतीक देहव्यापार वर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तीन मुलीची सुटका केली असून एका महिलेला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या पथकाने चंद्रपुर शहर हद्दीत गौतम नगर, चंद्रपूर येथे एक महिला मुलींकडून आर्थीक फायदया करीता अनैतिक देहव्यापार करवून घेते अशा मिळालेल्या माहिती वरून सदर माहितीची डमी ग्राहकाहडुन खात्री करून गौतम नगर, चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कार्यवाही केली असता त्या ठीकाणी एक स्त्री तीचे आर्थीक फायद्याकरीता ३ मुलींकडून देहव्यापार करवून घेताना मिळुन आल्याने तीला महिला पोलीसांचे मदतीने ताब्यात घेवून तीचे कडुन तीन पिडीत मुलींची सुटका करून त्यांना स्वी आधार गृह चंद्रपुर येथे दाखल करण्यात आले.

Recommended read : संतापजनक…! काँग्रेसचा महानगर अध्यक्ष कुणाल रामटेके अडकले विनयभंगाचा गुन्हात

सदर कार्यवाहीत आरोपी महिलेचे विरोधात पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अपराध कमाक १४४/२०२२ कलम ३७० ३७० (ए) ३७१ मा.द.वी. सह कलम ३, ४, ५, ६ अनैतीक मानवी व्यापार प्रतीबंधक अधिनीयम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर चे अधिकारी करीत आहे.

सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे यांच्या पथकाने केली आहे.

One thought on “अनैतिक देहव्यापार अड्यावर पोलिसांची धाड”
  1. […] टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांस मारहाण अनैतिक देहव्यापार अड्यावर पोलिसांच… संतापजनक…! काँग्रेसचा महानगर […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!