इरई नदीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू

चंद्रपूर : रविवारी सुटी असल्यामुळे दाताळा येथे इरई नदीच्या पात्रात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या रोहन बोबाटे (१७) व गौरव वांढरे (१६) या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी उघडकीस आली.

Recommended read: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

जिल्हा क्रीडांगण जवळीक लोकमान्य टिळक विद्यालयात दहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या या दोन मित्रांनी घरच्यांना न सांगता नदीत पोहायला जाण्याचा बेत आखला. त्यानुसार दुपारी ते नदीवर गेले.

नदी काठावर कपडे काढून आंघोळीसाठी पाण्यात उतरले. नदीला भरपूर पाणी असल्याने तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला.

Recommended read: गणपती विसर्जनासाठी गेलेला ट्रक्टर उलटून एका महिलेचा मृत्यू

यातील एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. दोघेही दाताळा येथील राहणारे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!