खुशखबर.........पेट्रोल ५ रूपये तर, डिझेल ३ रूपयांनी स्वस्त, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर कॅबिनेटच्या दुसऱ्या बैठकीत पेट्रोलचे दर 5 रुपये तर डिझेलचे दर 3 रुपये प्रति लीटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Recommanded Read- गोंडपिपरी- आष्टी राष्ट्रीय महामार्ग बंद

महागाईचा आगडोंब उसळला असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर हाेता. तर, दुसरीकडे राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल डिझेल दर कमी करण्याची घोषणा केली होती.त्यामुळे १४ जुलै ला झालेल्या दुसऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत पेट्रोलचे दर 5 रुपये तर डिझेलचे दर 3 रुपये प्रति लीटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय आज कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार असून पेट्रोल – डिझेलचे दर कमी केल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई काही प्रमाणात कमी होणार असल्याचा अंदाज आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

2 thoughts on “खुशखबर………पेट्रोल ५ रूपये तर, डिझेल ३ रूपयांनी स्वस्त, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!