चंद्रपूर : भरधाव वेगातील चारचाकी वाहन अनियंत्रित झाल्याने कार उलटून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना १८ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

Recommended read: बाबुपेठ येथील डॉ. शरयु पाझारे यांच्या सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर मनपातर्फे कारवाई

गोंडपिपरी तालुक्यातील पारगाव येथे लग्न समारंभासाठी जाणारे. चेक विठ्ठलवाडा येथे कार अनियंत्रित झाल्याने उलटली. या अपघातात चिन्मय महिपाल जुमनाके (१८, रा.आंबेधानोरा, ता. पोंभुर्णा) याचा जागीच मृत्यू झाला. समीर कोडापे, करण कोवे, आशीष कोडापे, आकाश मेश्राम हे जखमी झाले.

घटनास्थळी ठाणेदार जीवन राजगुरू, पोलीस कर्मचारी गोडसेलवार, पुलगमकर यांनी पोहचून जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले आहे.

One thought on “अनियंत्रित कार उलटल्याने एक ठार, चार जखमी”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!