लॉजवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे चिमूर सावजी लॉज

पोलिसांनी दहा जोडप्यांना घेतले ताब्यात

चंद्रपूर: चिमूर शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील मासळ चौकात असलेल्या एका लॉजवर पोलिसांनी शनिवारी दुपारी २.३० वाजता धाड टाकून अश्लील चाळे करीत असताना दहा जोडप्यांना पकडले. या कारवाईने चिमूर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चिमूर शहरातील वाढत्या नागरिकांमुळे शहरात अनेक व्यवसाय येत आहेत. सोबतच हॉटेल, लॉजच्या संख्येतही वाढ झाली आहे. यामध्ये काही लॉज चालकांनी कमी वेळात जास्त पैसे कमविण्याच्या नादात जोडप्यांना, शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना काही तासासाठी लॉजची रूम भाड्याने देण्याचा सपाटा चालवला आहे.

Recommended read: गोसेखुर्द कालव्यात 11 वर्षिय मुलींचा बुडून मृत्यू

नवीन बसस्थानक परिसरातील सावजी लॉजमध्ये मागील अनेक दिवसांपासूनहा प्रकार सुरू असल्याने स्थानिक व्यावसायिक, नागरिकांत चर्चा सुरू असताना चिमूर पोलिसांनी शनिवारी दुपारी २.३० वाजता लॉजवर अचानक धाड टाकली. त्यामध्ये दहा जोडप्यांना पोलिस ताब्यात घेतले.

लॉजवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे : दहा जोडप्यांना समज देऊन सोडले

लॉज मालक शेषराव भिवाजी बारापात्रे यांनी जोडप्यांना लॉजवर राहू दिले. मात्र या जोडप्यांची रजिस्टरमध्ये नोंद घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ३३ (डब्लू) सहकलम १३१ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. मात्र ताब्यात घेतलेल्या दहाही जोडप्यांना समज देऊन पोलिसांनी सोडून दिले.

Recommended read: चंद्रपुरातील OYO हॉटेलमध्ये वेशाव्यवसाय, एलसीबीची धाड

शाळकरी विद्यार्थीही घेतात आसरा

चिमूर शहरात प्रेमीयुगुलांना एकांतवासासाठी बगिचा किवा दुसरे स्थळ नसल्याने अनेक शाळकरी मुले-मुलीही या लॉजचा आसरा घेत असल्याची बाब शनिवारी स्थानिकांच्या चर्चेतून पुढे आली.

अश्लील चाळे : एक-दोन तासांसाठी पाचशे रुपये दर

चिमुरात असलेल्या लॉजमध्ये जाणाऱ्या जोडप्यांकडून लॉज मालक काही तासासाठी पाचशे रुपये घेतात. पाचशे रुपये दिल्यानंतरच या जोडप्यांना रूम दिली जाते. ही बाबही शनिवारच्या कारवाईने उघडकीस आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!