ओबीसीनी भोंगे लावने काढण्याच्या भानगडीत पडू नये : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

धार्मिक गोष्टींचा वापर करून विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होईल, यासाठी ओबीसींनी स्वत:चा वापर होवू देवू नये

चंद्रपूर : ज्या पद्धतीने विरोधी पक्षातील राजकारणी नेते मंडळी त्यांच्या स्वार्थापोटी धार्मिक गोष्टीचां वापर करून आपल्या राजकीय पक्षाला फायदा होईल व मते वाढतील याकरीता लोकांना भडकवित आहेत, त्यामध्ये जर आपल्या ओबीसी बांधवांनी भाग न घेता जर शांत राहिले तर आपली ओबीसीची किंमत किती आहे हे त्यांना कळेल कारण ओबीसी समाजा शिवाय कोणतीही योजना किंवा मेळावे यशस्वी होत नाही. हे त्यांना दाखवून देण्याची हीच खरी संधी आहे. असे झाले तर आपल्या ओबीसीची जातनिहाय जणगणना करणे, या व इतर मागण्या मान्य करण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडता येईल. म्हणून शांत रहा, भडकू नका व विशिष्ट राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून कोणाचे भोंगे लावण्याच्या व काढण्याच्या भानगडीत पडू नका, असे मत ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे यांनी मांडले आहे.

Recommended read: बंदुकीव्दारे खुनाच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांस अटक

राजकीय पक्षांनी नेहमीच ओबीसी युवकांचा वापर केला आहे. गर्दी ओबीसींची, पैसा ओबीसींचा, असे नेहमीच झाले. मात्र ज्यावेळी ओबीसींच्या जनगणनेचा विषय येतो, केंद्रात ओबीसी मंत्रालयाचा विषय येतो, ओबीसींच्या रोजगाराचा विषय येतो, ओबीसींच्या न्याय हक्क, अधिकार व मागण्यांचा विषय येतो, तेव्हा मात्र हे विशिष्ट पक्षातील राजकारणी दुर्लक्ष करतात. त्यामुळे आता ओबीसीनी सावध होणे आवश्यक आहे. यांच्या राममंदिर, हनुमान चालिसा, बाबरी मशीद, नमाज, प्रार्थना या प्रकरणात नेहमीच ओबीसी युवक पुढे राहीले आहे. मात्र जेव्हा ओबीसींच्या हक्काचा विषय आला तेव्हा मात्र धर्माचं राजकारण करणारे स्वार्थी राजकारणी नेहमीच ओबीसींना डावलत आले आहे, म्हणून यावेळी ओबीसी युवकांनी भोंगे लावण्याच्या व काढण्याच्या भानगडीत न पडता अलिप्त राहावे. म्हणजे ओबीसी शिवाय राजकारणी आंदोलन यशस्वी करू शकत नाही, हा संदेश जायला हवा, असे मत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी मांडले आहे.

One thought on “ओबीसीनी भोंगे लावने काढण्याच्या भानगडीत पडू नये : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!