बार्टी प्रमाणे महाज्योतीमध्ये ओबीसींच्याच संस्थांना प्राधान्य देण्यात यावे- राजूरकर

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चंद्रपूर: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मध्ये इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासाच्या योजना राबवितांना बार्टी चा धर्तीवर ओबीसींच्या संस्थांना प्राध्यान्य देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिवत सचिन राजुरकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री, ओबीसी विभागाचे सचिव यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Recommended read: बैलबंडीसह शेतकरी बुडाला तलावात

इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचा उद्देश मागास असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीकोनातून या संस्थेची स्थापना झाली.

Recommended read: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या२८ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्हावार प्रशिक्षण केंद्र उभारून प्रशिक्षण देण्याचे काम करावे व ते प्रशिक्षण केंद्र निवड करतांना अनुसूचित जाती प्रवर्गातीलच प्रशिक्षण संस्थाना, केंद्रांना या निवडीमध्ये प्राध्यान्य देण्याचे धोरण ठरविले आहे. तरी महाज्योती संस्थेने सुद्धा बार्टी च्या धर्तीवर निर्णय घेवून प्रशिक्षण केंद्र ठरवित असतांना ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाला प्राध्यान्य देण्याचा निर्णय घेवून तसा शासन निर्णय निर्गमित करावे.

Recommended read: नात पळून गेल्याच्या धक्क्याने आजीची आत्महत्या

यामध्ये अन्य कोणत्याही संस्थाना प्राध्यान्य देवू नये अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री, ओबीसी विभागाचे सचिव यांच्या मंत्रालयातील कार्यालयात जावून निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!