वर्धा येथील अवैध गर्भपात प्रकरणामुळे सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची झाडाझडती

पाच सोनोग्राफी, चार गर्भपात केंद्रांना नोटीस, एका गर्भपात केंद्राची तात्पुरती मान्यता रद्द

चंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील कदम रुग्णालय यात झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेत चंद्रपूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची तपासणी केली असता त्रुटी आढळून आल्याने पाच सोनोग्राफी केंद्र व चार गर्भपात केंद्रांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर एका गर्भपात केंद्राक्ट तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Recommended read: नागपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन सकारात्मक- मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत 20 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत प्रत्येकी तीन सदस्यांच्या एकूण चार समित्या गठीत करून जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या दरम्यान जिल्ह्यातील 50 सोनोग्राफी केंद्र व 33 गर्भपात केंद्राच्या तपासणीचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. तसेच ज्या तालुक्यात सोनोग्राफी व गर्भपात केंद्र अस्तित्वात आहे, त्या सर्व केंद्रांना भेटी देऊन पीसीपीएनडीटी / एमटीपी कायद्यानुसार सखोल तपासणी करण्यात आली.

कदम रुग्णालय यात झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेत, या मोहिमेंतर्गत काही त्रृटी आढळल्यामुळे पाच सोनोग्राफी केंद्रास व चार गर्भपात केंद्रास नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच एक गर्भपात केंद्र तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. काही सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांनी त्रृटींची पुर्तता केली असून नोटीस बजावण्यात आलेल्या केंद्रांकडून समाधानकारक पुर्तता न केल्यास सदर केंद्रांवर आणखी कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविले आहे.

One thought on “कदम रुग्णालय येथील अवैध गर्भपात प्रकरणामुळे सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची झाडाझडती”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!