अतिक्रमण विरुद्ध भाजपातर्फे आंदोलन करण्‍याचा इशारा

दुधडेअरी नजिकच्‍या सावरकर नगर परिसरातील नागरिकांची घरे हटवू नये, भाजपाची मागणी
कार्यवाही त्‍वरीत न थांबविल्‍यास भाजपातर्फे आंदोलन करण्‍याचा इशारा

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील दुधडेअरी परिसरातील सावरकर नगरातील शासकीय जागेत पक्‍की घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांना रेल्‍वे विभागातर्फे अतिक्रमण म्‍हणून नोटीस देण्‍यात आल्‍या आहेत व जागा खाली करण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आल्‍या आहेत. या अन्‍यायकारक कार्यवाहीबद्दल भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर शाखेतर्फे रेल्‍वे विभागाच्‍या स्‍टेशन मास्‍टर मुर्ती यांना आज निवेदन देण्‍यात आले.

Recommended read: तरूणींचा निवस्त्र व धडावेगळा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

यावेळी स्‍टेशन मास्‍टर मुर्ती यांच्‍याशी चर्चा करताना उमहापौर राहूल पावडे म्‍हणाले, महानगरपालिकेतर्फे या परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्‍यात आल्‍या आहेत. हे नागरिक महानगरपालिकेला मालमत्‍ता कराचा भरणा सुध्‍दा करीत आहे. या नागरिकांची घरे रेल्‍वे साईडींगपासून बरीच दूर आहेत. हे सर्व नागरिक कामगार व मोलमजूरी करणारे आहेत. त्‍यांची घरे हटविल्‍यास त्‍यांच्‍या निवासाचा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे. ही अन्‍यायकारक अतिक्रमण कार्यवाही त्‍वरीत न थांबविल्‍यास भाजपातर्फे आंदोलन करण्‍याचा इशारा राहूल पावडे यांनी दिला.

यासंदर्भात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेवून या विषयाकडे त्‍यांचे लक्ष वेधले असल्‍याचे राहूल पावडे यावेळी म्‍हणाले. या शिष्‍टमंडळात भाजपा महानगर सरचिटणीस राजेंद्र गांधी, नगरसेवक राहूल घोटेकर, प्रमोद क्षीरसागर, महेश जीते, बबन राऊत, बी.बी. सिंह आदींची उपस्थिती होती. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्‍वेच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांशी केलेल्‍या चर्चेनुसार उपमहापौर राहूल पावडे व शिष्‍टमंडळाला वरिष्‍ठ विभागीय अभियंता साऊथ नागपूर यांना दिनांक ५ एप्रिल २०२२ रोजी चर्चेला बोलाविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!