मुंबईतील आयपीएल स्पर्धेला दहशतवादी धोका नाही- IG Media Chandrapur News

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईत होवू घातलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर कोणताही प्रकारचा दहशतवादी धोका नाही, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली. आयपीएल 2022 चे आगमन 26 मार्च ला होत आहे.

सदस्य अमित साटम यांनी नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना याबाबत वक्तव्य केले होते. यावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

Recommended read : IPL 2022 : BCCI द्वारे वेळापत्रक जाहीर

आयपीएलच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियम आणि ट्रायडेंट हॅाटेलवर दहशतवादी हल्ला करण्याबाबत कोणतीही धमकी मिळाली नाही. खेळाडूंची निवास व्यवस्था असलेल्या हॉटेल्सची दहशतवाद्यांनी रेकी केली असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात येत आहेत. या वृत्ताचे खंडण करून अशी कोणतीही धमकी आणि रेकी करण्यात आली नाही, मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनीही केले आहे, असे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!