गडचिरोली पोलीसाकडुन दोन नक्षलवाद्यांना अटक

नक्षलवाद्यांना अटक : शासनाने जाहीर केले होते १० लाख रुपयांचे बक्षीस

गडचिरोली: दि. ०७/१०/२०१२ रोजी उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोगके सावरगाव परिसरात गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना ०२ संशयीत व्यक्ती मिळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता, ते नक्षलवादी असल्याचे समजले. त्यावरून ताब्यात घेवून पोनके सावरगाव येथे नक्षलवाद्यांना अटक केली.

Recommended read: बसस्थानकात दोन सख्ख्या भांवडांवर जीवघेणा हल्ला

नक्षलवाद्यांना अटक करण्यात आलेल्या मध्ये

  • सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे वय २४ वर्ष रा. मोरचूल ता. पानोरा
  • समुराम ऊर्फ सूर्या धसेन नरोटे व २२ वर्ष रा. मोरचूल ता. पानोरा जि. गडचिरोली यांचा समावेश आहे.

नामे मनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलान नरोटे हा माहे ऑक्टोबर २०१५ मध्ये टिपागड दलममध्ये भरती होवुन, डीव्हीसीएम जोगन्नाथा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर माहे ऑगस्ट २०१८ ते २०२० पर्यंत कंपनी १० मध्ये कार्यरत होता व सन २०१० आतापर्यंत पीपीसीएम म्हणून कंपनी १० मध्ये कार्यरत होता. महाराष्ट्र शासनाने नामे मनिराम ऊर्फ शंकर उर्फ कृष्णा स्वामलाल नरोटे याचेवर ८ लक्ष रुपये बक्षीस जाहीर केले होते.

Recommended read: सुन व पोटच्या मुलींने केली आईची हत्या

तसेच नाम समुराम ऊर्फ सूर्या घसेन नरोटे हा जनमिलिशिया सदस्य असून, महाराष्ट्र शासनाने त्याचेवर २ लक्ष रुपयेचे बक्षीस जाहिर केले होते. सदर दोन्ही नक्षलवाद्यांचा खून, जाळपोळ, चकमक अशा अनेक गुन्हयामध्ये सहभाग असून, सदर अटक नक्षलवाद्यांचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

दोन्ही पायांची विचारपूस केली असता, त्यांना वरीष्ठ हालवादी कॅडर कडून उत्तर गडचिरोलीमध्ये दलम पूर्ववत करण्याकरीता पाठवल्याबाबतची माहीती दिली. परंतु या दोघांच्या अटकेमुळे त्यांच्या विघातक प्रयत्नांना वेळीच आळा घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले आहे. तसेच गडचिरोली पोलीस दल अधिक सतर्क होवून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!