जागतिक सर्पदंश जागृति दिनाच्या बैठकीत व्हेनम बँक चा निर्णय

सर्पदंश मृत्यू 2030 पर्यंत अर्ध्यावर आणण्याचा निर्धार

मुंबई: भारतातली पहिली सर्पविष पेढी ( व्हेनम बँक ) आणि परीक्षण केंद्र राज्यात उभे राहणार असल्याची माहिती आज वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मंत्रालयात जागतिक सर्पदंश जागृती दिनानिमित्त झालेल्या बैठकी नंतर ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.निशिगंधा नाईक यादेखील उपस्थित होत्या.

Recommended read: कोलकोत्याचे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून देहव्यापार मध्ये गुंतविले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्पदंश मृत्यू 2030 पर्यंत अर्ध्यावर आणण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने वैज्ञानिक पूर्वतयारीचा भाग म्हणून विविध 52 विषारी सर्पांच्या विषाचा अभ्यास करण्याकरता पायाभूत संरचना उभी करावी लागेल. त्याचाच एक भाग म्हणून सर्पविष पेढी तसेच परीक्षण केंद्र उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Recommended read: चंद्रपूर व भद्रावती तालुक्यात लम्पीची लागण

जगातील सर्वाधिक सर्पदंश आणि तद्भव मृत्यू भारतात होतात, भारतातील सर्वाधिक सर्पदंश आणि तद्भव मृत्यू महाराष्ट्रात होतात अशी आकडेवारी संशोधनानंतर स्पष्ट झाली आहे. त्याचप्रमाणे सापाच्या विविध जातींच्या विषात फरक असतो. त्याप्रमाणे त्यांची प्रतिविषे वेगळी असतात. परंतु तशा वेगळ्या लसी उपलब्ध नाहीत. कारण केवळ नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे याच चार जातींच्या सर्पांच्या विषांचा अभ्यास आजवर झाला आहे.

Recommended read: सोमय्या पॉलिटेक्निक च्या प्राचार्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यां कडून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

भारतात तब्बल 260 सापांच्या प्रजाती असून त्यातील 52 विषारी आहेत. या उर्वरित सापांच्या विषाचा आत्तापर्यंत पुरेसा अभ्यासच झालेला नाही. या सर्व जातींच्या सापांच्या विषावर एकच प्रभावी प्रतिविष निर्माण करण्याच्या दृष्टीनेही संशोधन होणे गरजेचे आहे.

त्यासाठीच राष्ट्रीय सर्पविष संशोधन केंद्र, सर्पविष पेढी आणि परीक्षण केंद्र स्थापन होणे आवश्यक आहे, असे मंत्रीमहोदय ना.श्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!