जमिनीच्या वादातून खून: आरोपी लहान भावास अटक

चंद्रपूर: सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे.

मनोहर निंबाजी गुरुनुले (६२), शारदा मनोहर गुरुनुले (५०) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. या प्रकरणी धनराज निंबाजी गुरुनुले (५२) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Recommended read: मजुराकडून बांधकाम कंत्राटदारांची हत्या

जमिनीवरून मनोहर व धनराज गुरूनुले या दोन भांवडांमध्ये जमिनीवरून वाद झाला. त्यातच लहान भाऊ धनराज गुरुनुले यांनी आपल्या मोठा भाऊ मनोहर व वहिणी शारदा हिला सब्बलने मारहाण केली. त्यात मनोहर गुरुनुले याचा जागीच मृत्यू झाला, तर शारदा गुरुनुले हिला गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेची माहीती पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होवून आरोपी धनराज गुरुनुले याला ताब्यात घेतले. आरोपी विरोधात खुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे यांनी भेट दिली. घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!