गळफास घेतलेल्या अवस्थेत तरूणांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

गळफास : मृतकाचे हात बांधलेल्या अवस्थेत असल्याने हत्येचा संशय

चंद्रपूर: मुल रोडवरील एमईएल परिसरातील हनुमान मंदिराच्या मागील जंगलात एका २८ वर्षीय तरूणांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, तरूणांचे दोन्ही हात दुपट्याने बांधलेल्या अवस्थेत असल्याने हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. रामनगर पोलिस आत्महत्या कि हत्या या दोन्ही दुष्टिकोनातून तपास करीत आहे.

Recommended read: २५ लाखाचा सुंगधित तंबाखू जप्त*आठ जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

शाहरूख सलमानखान पठाण रा. दुर्गापूर असे मृतकांचे नाव आहे. शाहरूख हा मागील २७ मे पासून बेपत्ता होता. कुटूंबियांनी दुर्गापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान शुक्रवारी दुपारी रामनगर पोलिसांना एमईएल परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

Recommended read: कोरपनाचा तरूण झाला नायब तहसीलदार. *ओबीसी प्रवर्गातून राज्यात दहावा*

हत्या की आत्महत्या ?

मृतक तरूणांचे दोन्ही हात दुप्पट्याने बांधलेल्या अवस्थेत असल्याने हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. रामनगर पोलिस हत्या कि आत्महत्या याचा तपास करीत आहे. अधिक तपास रामनगर पोलिस करीत आहे.

3 thoughts on “गळफास घेतलेल्या अवस्थेत तरूणांचा मृतदेह आढळल्याने खळबळ”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!