चंद्रपूर: शहरातील कस्तुरबा मुख्य मार्गावर असलेल्या ज्यूबली शाळेच्या आवारातील जुन्या वसतीगृहाच्या छतावर एका 22 वर्षीय युवकाला सेलो टेप पट्टीने बांधून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकिस आली आहे. या घटनेमुळे चंद्रपूर शहरात खळबळ उडाली असून या घटनेमुळे शहर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ज्यूबली शाळेच्या परिसरातील वस्तीगृहात युवकाचा निर्घुण खून, मृतदेहाला सेलोटेप चिटकवून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

युवकाच्या मृतदेहाजवळ दारूच्या बॉटल्स आढळून आल्या आहे. त्यामुळे युवकाला मारेकऱ्यांनी दारू पाजून हत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाच्या डोक्यावर दारूच्या बॉटल्स फोडल्याची खूना दिसत असून मृतदेहाचे हात व पाय व शरीर सेलो टेपने पूर्णपणे चिटकवून मृतदेहाचा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मृतक युवक हा राजुरा तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आलेली आहे. याप्रकरणी पोलिसाशी संपर्क साधला असता टोलवाटोलवीची उत्तरे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केली. शहरातील मुख्य मार्गावरील एका शासकीय विद्यालयात एका युवकाचा खून करून मृतदेह फेकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शहर पोलिसाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!