अवघ्या चोविस तासात गुन्हा उघडकिस,

प्रियकर शिक्षक व मृतकांच्या पत्नीला अटकस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर: अनैतिक प्रेमप्रकरणात पती बाधा बनत असल्याने पत्नीने शिक्षक प्रियकरांच्या मदतीने आजारी पतीचा उशीने गळा दाबून खून केल्यानंतर चोरीचा बनाव रचण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

अवघ्या चोविस तासात स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने खुनाचा गुन्हा गुन्हा उघडकीस आणून आरेापी प्रियकर शिक्षक स्वप्निल ताराचंद गावंडे रा. घुटकाळा तलाव , व मृतकांची पत्नी सुनिता मनोज रासेकर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Recommended read: अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसान भरपाई साठी चंद्रपूर जिल्ह्याला ३१० कोटी ९८ लक्ष रुपये प्राप्त

चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात मनोज रासेकर यांचा गुरूवारी मध्यरात्री अनोळखी इसमाकडून खून करण्यात आला होता. मध्यरात्री खून झाल्याने पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळाला भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, संदीप कापडे यांनी गोपनिय माहिती काढली असता, मृतकांच्या पतीने मुलीच्या शाळेतील एका शिक्षकांसोबत ओळख निर्माण होवून प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते.

प्रेमसंबंधात पती बाधा बनत होत होता. पती मनोज रासेकर हा मागील पंधरा दिवसापासून बिमार असल्यामुळे आजारपणामुळे पतीचा मृत्यू देखावा निर्माण करून पतीच हत्येचा कट रचला.

Recommended read: लम्पी स्कीन डिसीज ने चंद्रपूर जिल्ह्यातील ८ गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित

प्रियकरांच्या मदतीने पतीचा उशीने गळा आवळून खून केला. यावेळी मृतकांच्या आईला जाग आल्याने आरडाओरड झाला. यावेळी दोघांनीही चोरीचा बनाव रचून प्रियकर पसार झाला.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात खूनाचा गुन्हा उघडकीस आणत आरेापी प्रियकर शिक्षक स्वप्निल ताराचंद गावंडे व मृतकांची पत्नी सुनिता मनोज रासेकर याना दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दोघांनीही गुन्हा कबुल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!