वृद्धाचा खून : आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चंद्रपूर: वृद्धाचा खून : जुन्या वादातून वृद्धावर चाकूने हल्ला करून जागीच ठार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यात चेक दरूर येथे घडली.

Recommended read: चंद्रपूरातील तरूणाई ई-सिगारेटच्या विळख्यात

गोंडपिपरी तालुकाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चेक दरुर येथील किसन बाघू वराते (७५) यांच्यावर वैयक्तिक जुन्या वादावरून मोरेश्वर गिरमा भोयर (४५) यांनी धार-धार चाकूने हल्ला करून सकाळी ९ वाजताच्या दरम्यान गंभीररित्या जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जीवन राजगुरू यांनी सहकऱ्यांसह घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेत किसन वराते यांना उपचारासाठी गोंडपिपरी वरून चंद्रपूर नेताना वाटेतच कोठारी जवळ प्राणज्योत मावळली.

Recommended read: चंद्रपूर वीज केंद्र CSTPS राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करणार असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!