वर्धा नदीवरील अपघात नसून खून

अनैतिक संबंधामुळे प्रियकराच्या मदतीने पतीचा खून  

चंद्रपूर : गुरुवारच्या रात्री बामणी राजुरा मार्गावरील वर्धा नदी त मोटर सायकल वरून नदीत पडून मृत्यू झाल्याची घटना बल्लारपूर पोलिसांनी अपघात नसून नियोजित कट करून खून केल्याचे तपासात उघडकीस आहे. अनैतिक संबंधामध्ये अडसर येणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे.या खून प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी दोन आरोपीस अटक केली आहे. मृतकाचे वर्धा नदीत बुडालेले शव शनिवारी दुपारी राजुरा तालुक्यातील चुनाळा जवळील वर्धा नदीच्या डोहात मिळाले आहे.

Recommended read: सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून आत्महत्या

नियोजित कट करून खून

डॉ.आंबेडकर वॉर्डात राहणार रामेश्वर उर्फ लाल्या कालिचरण निषाद वय ३८ हा आरोपीसह मजुरीचे काम करायचा. आरोपी सुरज हुबलाल सोनकर हा त्याच परिसरात राहत होता. सुरज चे रामेश्वर यांच्या पत्नी सोबत अनेतिक संबंध होते. त्यामुळे तो अडसर वाटत होता. दरम्यान रामेश्वरला फिरून येऊ म्हणून मोटार सायकल वर बसवून घेऊन गेला नंतर निषाद ला दारू पाजली व राजुरा येथील रामू च्या धाब्यावर जाऊन दोघांनी जेवण केले.त्या आधी निषाद ला आरोपीने पुन्हा दारू पाजली व त्याला घेऊन वर्धा नदीवर आला व आपल्या साथीदाराच्या सोबत मिळून त्याला नदीच्या पाण्यात बुळवून खून केला.

कपडे बदलवून पुलावर आला व ९ वाजून ५८ मिनिटांनी पोलिसांना ११२ नंबरवर फोन करून अपघात होऊन जोडीदार वर्धा नदी पुलावरून पडल्याचे सांगितले,आरोपीने पुलाजवळ असलेल्या फळविक्रेत्यांनाही गाडी पुलाखाली पडल्याचे सांगितले. या दरम्यान त्याचा साथीदार बेपत्ता झाला.

आरोपीने केलेले हे नाटक जास्त काळ टिकले नाही पोलीस निरीक्षक उमेश पाटील तात्काळ तपासाची चक्र फिरविली आपल्या चमूसह रामूच्या धाब्यावर गेले व तेथे सीसीटीव्ही फुटेज बघताच त्यांना संशय आला जेवतांना आरोपीचे वारंवार बाहेर जाणे फोनवर बोलण्यावरून संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन हीसका दाखवला असता अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!