हत्येचा थरार : धारदार शस्त्राने तरुणाचा शिरच्छेद

हत्येचा थरार : धारदार शस्त्राने तरुणाचा शिरच्छेद

दोघांना अटक

चंद्रपूर : शहरातील दुर्गापूर परिसरात भररस्त्यावर हत्येचा थरार अनुभवायला मिळाला. ७ ते ८ आरोपींनी धारदार शस्त्राने एका ३५ वर्षीय तरुणाचा शिरच्छेद केला. ही थरारक घटना सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. महेश मेश्राम, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Recommended read: वनमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात का वाढतो आहे मानव-वन्यजीव संघर्ष?

दुर्गापूर भागातील मेजर गेट परिसरात महेश मेश्राम याची हत्या करण्यात आली. ७ ते ८ जणांनी मिळून महेशचे शिर धडावेगळे केले. मृत महेशची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने जुन्या वादातून त्याचा खून झाल्याचा कयास पोलिसांनी वर्तवला आहे.

Recommended read: विदर्भ राज्य आंदोलन: विदर्भातील खासदारांचे राजीनामे मागणार

याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी २ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात तणाव आणि दहशतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!