सुन व पोटच्या मुलींने केली आईची हत्या

चंद्रपूर: शेतीच्या वादातून पोटच्या मुलगी व सुनेने जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर येथे ३ ऑक्टोबर २०२२ घडली.

Recommended read: गोंडपिपरीत भीषण अपघात

दरम्यान हत्येची माहिती कळू नये यासाठी आरोपींनी गावातीलच स्मशानभूमीत अंत्ससंस्कार उरकला. मात्र, पोलिसांनी हत्येचा उलगडा करून मुलगी व सुनेला अटक केली आहे. वंदना खाते असे मुलीचे तर चंद्रकला सावसाकडे असे आरोपी सुनेचे नाव आहे.

तानाबाई महादेव सावसाकडे या महिलेची घरातील लोकांनी आईची हत्या केल्याची तक्रार महिलेची मुलगी रंजना रामेश्वर सोनवणे हिने सिंदेवाही पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी मुलगी व सुनेला ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.

Recommended read: जन्मदात्या बापाकडून १० वर्षीय दिव्यांग वेडसर मुलींची हत्या

दरम्यान सखोल चौकशी केली असता, मृत महिलेची मुलगी वंदना हिने तिचे आईला ३ ऑक्टोबरला शेतीच्या वादावरून झालेल्या भांडणामध्ये वंदना व तिची वहिनी चंद्रकला या दोघींनी मिळून आईचे नाक व तोंड दाबून क्रूरपणे हत्या केली व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गावात कोणालाही माहिती पडू न देता तिचे अंत्यविधी गावाचे बाहेर जमिनीमध्ये पुरून उरकण्यात आले असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी मुलगी व सुनेला अटक केलेली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!