पोलिस अधिक्षक अरिवंद साळवे, अपर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी- चाकूने गळा कापून हत्या - IG Media Chandrapur

मुख्य सुत्रधार विधीसंघर्ष बालिकेला अटक, साथीदार फरार

मृतक तरूणीचे शिर, खूनात वापरलेले शस्त्र अद्याप न मिळाल्याने रहस्य अजूनही कायम

चंद्रपूर: दोन मैत्रिणीत झालेल्या वादामुळे त्या युवतीची चाकूने गळा कापून हत्या करण्यात आली. ओळख पटू नये व पुरावे नष्ट करण्यासाठी शिर, अंगावरील कपडे आरोपींनी घेवून गेले. मात्र, चंद्रपूर पोलिसांनी या रहस्यमय गुन्ह्याचा छडा लावला असून मुख्य सुत्रधार भद्रावती येथील विधीसंघर्षग्रस्त १७ वर्षीय बालिकेला ताब्यात घेण्यात आले आहे. ही हत्या करतांना सोबत असलेला प्रियकर फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी पत्रपरिषदेत दिली.

दरम्यान पोलीसांना मृतक मुलीचे शीर, हत्याकांडात वापरेला चाकू अद्याप मिळालेला नाही. मृतक युवती नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील रहिवासी आहे.

Recommended read: गोंडपिपरी तालुक्यात दिवसाढवळ्या वाघाचा हल्ला

मृतक व ताब्यात घेण्यात आलेली विधीसंघर्षग्रस्त बालिका या दोघी नागपूर व चंद्रपूर येथे एकत्र राहात होत्या. दरम्यान दोघींमध्ये पैशावरून तथा इतर गोष्टींवरून वारंवार वाद व्हायचा. हा वाद इतका विकोपाला गेला की, विधीसंघर्ष बालिकेने प्रियकराच्या मदतीने प्रथमत: चंद्रपूर येथे बोलाविले. चंद्रपुरातील वरोरा नाका चौकातून रात्री मृतक तरूणीला दुचाकीने भद्रावती येथील एका निर्जण स्थळी नेवून चाकूने गळा कापून हत्या केला. विशेष म्हणजे खूनाच्या पूर्वी आरोपींनी घटनास्थळाची रेकी केली होती. मृतक मुलीची ओळख पटू नये यासाठी तिचे डोके व अंगावरील कपडे आरोपींनी घेवून गेले.

https://videopress.com/v/6SKv6CD1?resizeToParent=true&cover=true&preloadContent=metadata&useAverageColor=true

सदर खून प्रकरण संदेवनशिल असल्याने पोलिस अधिक्षक अरिवंद साळवे, अपर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी मृतक तरूणीची ओळख पटविल्यानंतर एका विधीसंघर्ष बालिकेला चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. सदर बालिका गुन्ह्याची मुख्य सुत्रधार असून तिचा साथीदार प्रियकर हा फरार आहे. दरम्यान पोलिसांना अद्याप मृतक तरूणीचे डोके, खून करण्यात वापरण्यात आलेले शस्त्र आढळून आलेले नाही. त्यामुळे आणखी या प्रकरणाची रहस्य वाढले आहे. या खूनात आरोपींची संख्या किती, आरोपी कोणत्या जिल्ह्यातील आहे, खूनामागे दुसरे कोणते कारण आहे याचा पोलिस तपास करीत आहे.

या प्रकरणात विधी संघर्षग्रस्त बालिकेचा प्रियकर हा नंदोरी येथे खासगी नोकरीवर असल्याची माहिती आहे. मोबाईल वरून या संपूर्ण हत्येचे गुढ उलगडले आहे. पत्रपरिषदेला अपर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!