थकबाकी भरण्याची महावितरणचे ग्राहकांना विनम्र निवेदन

थकबाकी भरण्याची महावितरणचे ग्राहकांना विनम्र निवेदन

चंद्रपूर: महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी ४५५ कोटी ९४ लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.

Recommended read: चंद्रपूर जिल्ह्यातील सहा तर गडचिरोलीतील दोन वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थि युक्रेनमध्ये अडकले

चालू आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपणार आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन १५ कोटी ४ लाख येणे आहे. तर वाणिज्यिक गाहकांकडुन ३ कोटी १८ लाख येणे आहे. औद्योगिक ग्राहकांकडुन ४ कोटी ३१ लाख थकबाकी वसुली येणे आहे. कृषिपंपधारकांडून २१८ कोटी ९० लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ४ कोटी ४३ लाख तर ग्रामीण व शहरी पथदिवे यांच्याकडून २०७ कोटी ६८ लाख येणे आहेत.

यासंदर्भात भ्रमणध्वणी संदेषवजा तसेच छापिल नोटीशी देण्यात आल्या आहेत. नोटीशी देवून आता नोटीशीची मुदतही संपली आहे. थकबाकी वसुली करिता कठोर पाऊले उचलत महावितरण द्वारा थकबाकीदार, घरगुती ग्राहकांसोबतच पाणीपुरवठा योजना, पथदिवे, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यास सामान्य जनेतेची असुविधा थकबाकी न भरल्या गेल्यामुळे ओढावणार आहे.

2 thoughts on “घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पाणीपुरवठा व पथदिव्यांची थकबाकी ४५५ कोटी ९४ लाखात घरात”
  1. […] विद्यार्थि युक्रेनमध्ये अडकले घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पाणीपुर… वनाधारीत शाश्वत विकासासाठी जिल्हा […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!