लाकूड वाहतूक परवाण्यासाठी वनपालाने घेतली १ लाख रूपयाची लाच

चंद्रपूर: सोलर सिस्टम चे डिमांड काढून देण्याच्या कामाकरीता ६ हजार रूपयांची लाच स्विकारतांना वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील महावितरणच्या सहायक अभियंत्ता श्रिणु बाबू चुक्का यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे.

Recommended read- आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

तक्रारदार हा सोलर सिस्टम लावून देण्याचे काम करतो. ग्राहकांकडे लावून देण्यात येणाऱ्या सोलर सिस्टमच्या डिमांडकरीता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील सहायक अभियंत्ता श्रिणु बाबु चुक्का याने ६ हजार रूपये लाचेची मागणी केली.

Recommended read- शिंदे गटात सामील झाल्याच्या टिकेनंतर आ. किशोर जोरगेवार यांचे स्पष्टीकरण

लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीवरून सापळा रचून महावितरणच्या कार्यालयात सहायक अभियंत्ता श्रिणु बाबु चुक्का यास ६ हजार रूपये स्विकारतांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक अविनाश भामरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या पथकाने केली आहे.

2 thoughts on “लाच घेतांना महावितरणच्या सहायक अभियंत्ता ला अटक”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!